करिअरविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

सिन्नर महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष दिंडी

सॅमसोनाईट कंपनी आणि सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य

प्रा. डॉ.सोनाली पाटील (विकासाची वाट प्रतिनिधी)
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन. यु. पाटील, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एस. टी. पेखळे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. शेलार, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. ललित कळसकर, डॉ. डी. बी. वेळजाळी, प्रा. एस. पी. जाधव, कनिष्ठ महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. टी. सोनवणे,प्रा.कैलास काळे, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रा जावेद शेख, प्रा. ए. ए. पोटे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसह, अभंग गाथा आणि विविध वृक्षांची रोपे ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी टाळ, वीणा आणि मृदुंगासह पारंपरिक पद्धतीने ज्ञानोबा तुकाराम आणि अभंगांच्या गजरामध्ये दिंडी काढली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी फुगडी व नृत्याचा आनंद घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी आध्यात्मिक प्रगती बरोबरच पर्यावरण रक्षणाचा अनोखा संगम आपल्या ह्या वृक्षदिंडीमधून साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली वृक्षांची रोपे जिवापाड जपून मोठी करावीत. हीच खरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाप्रती आपली भक्ती ठरेल असे सांगितले.

वृक्षदिंडीचे औचित्य साधून गोंदे येथील एमआयडीसीमधील सॅमसोनाईट कंपनी आणि सामाजिक वनीकरण विभाग सिन्नर यांच्याकडून प्रत्येकी २०० वृक्षांची रोपे महाविद्यालयाला मिळालेली आहेत. यामध्ये फळझाडांचा समावेश असून हे सर्व ४०० वृक्षांची रोपे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दत्तक दिले जाणार असून त्यांचे संगोपनही केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!