नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे “प्रिय कविते” उपक्रमाचे आयोजन
मान्यवरांची उपस्थिती, सदस्यांचे वाढदिवस साजरे

नाशिक : येथील नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळातील ज्येष्ठ सभासदांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने डॉ. किरण सोनार यांच्या “प्रिय कविते” हा कवितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांच्या सोबत कवयित्री अलका कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. प्रतिभा किरण सोनार यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ह्या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. किरण सोनार यांनी केले.






सदर कार्यक्रम प्रसंगी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे रक्त शर्करा, तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. सर्व सभासदांनी याचा लाभ घेतला.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री. मुकुंद पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष श्री. पंडितराव सोनवणे, श्री. सुधाकर शिरोडे कोशाध्यक्ष, संचालक श्री. गिरीश गवांदे, श्री. रामदास ठोंबरे, श्री. सूर्यकांत सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी श्री. आप्पासाहेब देसले यांनी ज्येष्ठांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.






