करिअरधार्मिकनाशिक कुंभमेळामहाराष्ट्रविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरसामाजिकसांस्कृतिक

यजुर्वेद मंदिरात १९ बटूंचे व्रतबंध सामुहिक पद्धतीने संपन्न

नाशिकच्या शुक्ल यजुर्वेदिय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे आयोजन

नाशिक : येथील शुक्ल यजुर्वेदिय मध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे यजुर्वेद मंदिरात १९ बटूंचे व्रतबंध सामुहिक पद्धतीने संपन्न झाले. यावेळी स्मिता चंद्रात्रे तसेच रविंद्र कुलकर्णी यांना डॉ.अभय सुखात्मे यांच्या हस्ते आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी ॲड.मिलींद चिंधडे आणि मुक्ता चिंधडे यांनी देणगी दिली आहे. यावेळी श्री काळाराम मंदिराचे श्री महंत सुधीरदास महाराज यांनी सर्व बटूंना वेदांचे महत्त्व सांगून शुभ आशीर्वाद दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुजनांनी मंत्रोच्चाराने कार्यारंभ केला. वे. मु. दिनेश शास्त्री गायधनी, वेमु कौस्तुभ शास्त्री शौचे, रवींद्र देव, उपेंद्र देव, पंडित भूषण शुक्ल, रामकृष्ण उपासनी या गुरुजनांनी समंत्र उपनयन संस्कार संपन्न केले.

याप्रसंगी कै.शैलजा शुक्ल, कै.उषा पाराशरे, श्री. सतीश शुक्ल, वृंदा कुलकर्णी,श्रीकांत निजामपूरकर, डॉ. शरद कुलकर्णी ऍडव्होकेट सुहास भणगे, सचिन वाघमारे, प्रतिभा वैद्य, हरीश चौबे, डी. एम. कुलकर्णी, प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सामूहिक व्रतबंध कार्यासाठी देणगी देऊन सहकार्य केले. संस्थेचे यावर्षी सामूहिक व्रत बंधाचे ४१ वे वर्षे होते.

सतिश शुक्ल, ऍडव्होकेट भानुदास शौचे, रवींद्र देव, तुषार जोशी, धनंजय पुजारी, मंजुषा अगस्ते, महेंद्र गायधनी, चंद्रकांत महाजन, ऍडव्होकेट सुहास भणगे, उदय जोशी, प्रतिक शुक्ल, अर्चना रोजेकर, सुभाष भणगे, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, रोहिणी कुलकर्णी, उपेंद्र देव, रत्नप्रभा गर्गे रामकृष्ण उपासनी अवधूत कुलकर्णी, रघुनाथ जोशी, प्रमोद मुळे, दिलीप शुक्ल, अनिता कुलकर्णी,शांता जाधव, गजानन जाधव, सुनिता परमार,यांनी या शुभ कार्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.हरीश चौबे,ओंकार शौचे, ऋत्विका शौचे, ओवी शौचे,ज्ञानेश देशपांडे, दीपक गजानन कुलकर्णी, यांनी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमास ऍडव्होकेट भानुदास शौचे यांचे मार्गदर्शन लाभले

आपणही चारा दान करू शकता…!

श्रीकृष्णा गोशाळा, नाशिक…

जय शंकर विजयांगण सीनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन वृद्धाश्रम, मुक्त विद्यापीठ रोड, वंडर झोनजवळ, गोवर्धन शिवार, गंगापूर, नाशिक.
📞8888947979
📞7720030574.
🔖
भारतीय संस्कृतीत गोमातेची सेवा अतिशय पवित्र मानली जाते… गोशाळेसाठी चारा दान करणे, हे एक पुण्याचे काम आहे.
:- विजयकुमार इंगळे, अध्यक्ष, श्रीकृष्णा गोशाळा…
चारा दान करण्याचे प्रकार:

  • गवत, भूसा, धान्य आणि अन्य चारा दान करू शकता. (शिजवलेले अन्न नकोय)
  • गोशाळेसाठी आर्थिक दान किंवा चारा पाठवू शकता.
    गोशाळेत संपर्क: 🍁
    (फोन पे : 8888947979)

✨गोशाळेसाठी चारा दान करण्याचे आवाहन…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!