जैन संप्रदायातील ग्रंथांची पालखी मिरवणूक संपन्न
चातुर्मासासाठी जैन मुनींचे उद्या कुसुंब्यात होणार आगमन, उपस्थित राहण्याचे आवाहन

नितीन इंगळे (धुळे जिल्हा प्रतिनिधी)
धुळे – तालुक्यातील कुसुंबा (प्रतिनीधी) ता. जि. धुळे. कुसुंबा नुकतीच दाेन हजार प्राचीन प्राकृत ग्रंथांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. कुसुंबा येथील सकल जैन समाज बांधवांच्या उपस्थितीत श्रुतपंचमी अर्थात प्राकृत दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जैन संप्रदायातील महान ग्रंथ धवला माधवला षटखंडागम ग्रंथ हे याच दिवशी पुष्पदंत मुनिश्री व भुतबली मुनिश्री यांच्यामार्फत प्राकृत भाषेत दाेन हजार वर्षांपूर्वी गुजरात मधील अंकलेश्वर नगरात शब्दबद्ध लिपीबद्दल झाला होता. हा दिवस म्हणजे ‘श्रुतपंचमी’ दिवस म्हणून साजरा केला जातो.

ग्रंथ प्राकृत भाषेत असल्याने जैन समाज प्राकृत दिवस साजरा करीत असतात. या दिवशी ग्रंथाची पूजा अर्चा करून पालखी काढतात. संस्कृतीचा आधार असलेल्या शास्त्र ग्रंथांच्या संरक्षण संवर्धन व्हावे, हा त्यांचा उद्देश आहे. कुसुंब्यातील प्राचीन जैन मंदिरात प्राचीन शास्त्र ग्रंथ एका मंचावर ठेवण्यात आले हाेते. श्रावक श्राविकांनी ग्रंथ शास्त्रांची भक्ती भावाने पूजा केली. सकाळी अभिषेक पूजन व शांतीधारा केली. विश्वशांतीसाठी व सुख-समृद्धीसाठी विश्वसभा (शांतिमंत्र ) द्वारे भगवंतावर शांतीधारा करण्यात आली. पूजा अभिषेकानंतर पालखीचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत षटखंडागम ग्रंथ ठेवून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी पालखीचे स्वागत केले. काही भक्तांनी मंगल आरती पूजन करून आपले भाव प्रकट केले. सर्व धर्मीयांनी पालखीचे भव्य स्वागत करून आनंद द्विगुणीत केले. पालखी नगराच्या विविध भागात मार्ग करीत प्राचीन क्षेत्र येथे विसर्जन झाले असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख सतीश वसंतीलाल जैन यांनी दिली. रात्री क्षेत्रावर अखंड णमोकार पाठ नंतर भक्ताम्बर ४८ दीपप्रज्वलनाने अनुष्ठान अधिक कार्यक्रम संपन्न झाले.

चातुर्मासासाठी जैन मुनींचे उद्या कुसुंब्यात होणार आगमन, स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
वर्षायोगसाठी कुसुंब्यात २ जुलैला २ महाराज आणि २ माताजींचे आगमन स्वागत मिरवणुकीची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे असून कुसुंबा येथे प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर वर्षायोग अर्थात चार महिने चातुर्मासासाठी २ महाराज आणि २ माताजींचे २जुलै वार बुधवार रोजी नगरात आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जल्लोषात स्वागत मिरवणुकीची जय्यत तयारी पार्श्वनाथ सेवा समिती आणि समाज बांधवांनी पूर्णत्वाकडे नेली असून तपस्वी दादागुरु प. पु. दिगंबराचार्य समाधीस्थ आचार्य संन्मतीसागरजी महामुनीश्री यांचे परमशिष्य प. पू. आचार्य सुंदरसागरजी महाराज यांचे परमशिष्या प. पु. आर्यिका सुनयमती माताजी प. पु. क्षुल्लिका सुधन्यमती माताजी प. पु. श्री १०५ सुपर्वसागरजी महाराज व प. पु. श्री १०५ अनुश्रमणसागरजी महाराज या चार तपस्वी वृंदांचे कुसुंबा येथे आगमन होत आहे. चातुर्मासामुळे लहानांपासून थोरापर्यंतचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अनेकांचे कुसुंबा चातुर्मास पर्वणीकडे लक्ष वेधले होते, अखेर ते स्वप्न साकार झाल्याचे मनस्वी आनंद व्यक्त होत आहे. अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख आणि प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश जैन तसेच, महेंद्र हिरालालजी यांनी दिली.
चातुर्मासासाठी मध्यप्रदेशातुन विहार करीत महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये भ्रमण करीत अहिंसाचा संदेश देत सुमारे ३०० किलोमीटर पदयात्रा करीत मलकापूर मार्गे पारोळा, मुकटी, धुळे, आनंदखेडा मार्गे २ जुलै रोजी सकाळी आठ वाजता तपस्वी वृंदांचे कुसुंब्यात आगमन होईल. पार्श्वनाथ सेवा समितीचे पदाधिकारी तसेच सकल जैन समाज व ग्रामस्थांतर्फे आदर्श हायस्कूल पुलाजवळ तपस्वींचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाविकांनी पुलाजवळ बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्षेत्राचे विश्वस्त आणि समाज बांधवांनी केले आहे. चातुर्मास आगमन प्रसंगी नगरात पहिल्या दिवशी तपस्वींचा कोणत्या भाग्यवंत श्रावकांकडे आहार विधी संपन्न होणार आहे याकडे भाविकांचे लक्ष वेधले आहे.

नम्र आवाहन, आपणही आपले सत्पात्री दान वृद्धाश्रमाला देवू शकता…
नाशिक येथील जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक भावनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. समाजातील संस्कारांची पिढी जगातून नष्ट होवू पाहत असताना नाशिकच्या गंगापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास नक्कीच आपले पाठबळ असू द्यात. ज्या वाचकांना या चांगल्या सामाजिक कार्यासाठी दान, सहकार्य करायचे असल्यास त्यांनी नक्कीच जय शंकर विजयांगण सिनिअर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला मदत करू शकता. मदत देण्यासाठी क्यू आर क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.
शांतीदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी, सातपूर, नाशिक.




