करिअरमहिलाविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

‘जागर मंगळागौरीचा 2025’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

नाशिकच्या जागृती फाऊंडेशनतर्फे आयोजन

नाशिक : जागृतीज फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित ‘जागर मंगळागौरीचा 2025’ हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच रंगतदार वातावरणात पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून समाजसेवेत अग्रेसर असलेल्या जागृतीज फाऊंडेशनच्या या उपक्रमाला नाशिककर महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली आणि त्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली.

श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात मंगळागौर ग्रुप स्पर्धा, श्रावण क्वीन सौंदर्य स्पर्धा, उखाणा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रॅम्प वॉक अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये लहान चिमुकल्यांपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, हास्यविनोदाचे उखाणे आणि नृत्य सादरीकरण यामुळे कार्यक्रमात रंगत वाढली. संपूर्ण वातावरणात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिकतेची सरिता वाहताना दिसली. कार्यक्रमास अनेक मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये अ‍ॅड. सौ. स्नेहल जामखिंडीकर, मेघा पाटील, निशा कापडणीस, स्मिता अहिरे, वैभवी घागरे, शितल जाधव, अमोल नाशिककर, हेमंत नाशिककर, गौरी गोसावी, गणेश जाधव, हर्षाली भोसले, सानिका बागुल, दीप्ती करर्डेल, मनिषा देशमुख, निलम कोडे, किरण आव्हाड, नारायण घुगे, एकता कदम, दीपक जैन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन आरती जैन यांनी केले. प्रशांत शेळके (संस्थापक) व ललिता नवघिरे (अध्यक्षा) यांच्या नेतृत्वाखाली जागृतीज फाऊंडेशनने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व देखण्या पद्धतीने यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!