

जनार्दन धनगे (विकासाची वाट प्रतिनिधी)
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्रीसिद्ध क्षेत्र जैन दिगंबर देवस्थान, मांगीतुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मांगीतुंगी येथे वृक्षलागवड प्रकल्प व प्लास्टिक मुक्त अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड व प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. त्यासोबतच सिडबॉल मांगीतुंगी डोंगर परिसरात टाकण्यात आले. महाराष्ट्र शासनाने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवले आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘एक पेड़ मां के नाम’ या उपक्रमाचे निमित्ताने मांगीतुंगी डोंगर परिसरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करताना चिंच, लिंब, वड, पिंपळ, बदाम , सीताफळ, जांभूळ अशा विविध देशी फळ झाडांची व नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यासोबतच सुमारे चारशे जांबुळाच्या बियांचे सिडबॉल तयार करून ते मांगीतुंगी डोंगर परिसरात टाकण्यात आले.


नामपूर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा पर्यावरण संरक्षण, सामाजिक जनजागृती याबाबत नेहमी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. वृक्षलागवडी सोबतच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी वृषभदेव देवस्थान परिसरात येणाऱ्या पर्यटकांकडून फेकले जाणारे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात संकलित करून प्लास्टिक मुक्त अभियानाचा संदेश ही या ठिकाणी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दिला.

नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देताना पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगितले व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अनुकरण समाजातील प्रत्येक घटकाने करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा . कमलाकर गायकवाड, प्रा भूषण खैरनार, प्रा. ज्ञानेश्वर थोरात, प्रा.सिद्धार्थ जगताप व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी सचिन जाधव, ओंकार पाटील, शुभम गलांडे,तन्मय निकम, अक्षय अहिरे,यशराना मगर, राकेश पगार, अमोल पगार, दिगंबर कांदळकर,तेजस खैरनार, गणेश खैरनार, संकेत खैरनार, विनोद खैरनार,खुशाल जाधव, संकल्प अहिरे, कुणाल धोंडगे, विवेक भामरे या स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक प्रा. हर्षल बच्छाव यांनी केले.





