कुसुंबा आश्रमशाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पिंपळनेर संचलित केशव स्मृती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा तसेच मुक्ताई पोस्ट बेसिक संलग्न कै. सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेचा संयुक उपक्रम

(नितीन इंगळे : विकासाची वाट न्यूज प्रतिनिधी)

धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पिंपळनेर संचलित केशव स्मृती प्राथमिक आदिवासी आश्रमशाळा तसेच मुक्ताई पोस्ट बेसिक संलग्न कै.सुकदेव नाना पगारे उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतर्फे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात आश्रमशाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंजि. मोहनराव सुर्यवंशी तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थचे सचिव स्वप्नीलजी पगारे तसेच संस्थेच्या संचालिका छायाताई पगारे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शेवाळे ए. एल, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक /प्राचार्य गवळी के. एस., जि .प. सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे, सुनिल शिंदे, सुधाकर जाधव, कुसुंबा येथील उपसरपंच स्वाती जाधव, अरुण पाटील, निळकंठ पाटील, जेष्ठ नागरिक विनायक पाटील, दत्तनगर येथील पोलीस पाटील, विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकलाडे सु.अ. व प्रा. महिरे पी.बी. तर प्रास्ताविक भामरे एम डि. यांनी केले. दत्तनगर येथे स्वातत्र्यंदिननिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमात आयोजित विविध आदिवासी गीते, गायन स्पर्धा,’ नृत्य स्पर्धा , देशभक्ती गीत, आदिवासी क्रांती गीत, वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यानी मोठया उत्साहात सहभागी नोंदवला होता. समारोप प्रा. महाजन के. व्ही. यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपुर्ण शिक्षक तसेच, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





