आरोग्यकरिअरधार्मिकनाशिक कुंभमेळामहिलाविकासाची वाट न्यूज विशेषविशेषशहरशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक

राष्ट्र सेविका समितीचा 90 वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

कोजागरी पौर्णिमा आणि
‘व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण करणे हीच खरी काळाची गरज’ :
राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये शिस्तबद्ध संचलन व शस्त्र पूजन आणि ध्वज पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

स्त्रीशक्तीचा जागर आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजविणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे विविध उपक्रम व शिस्तबद्ध संचलनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, प्रांत अधिकारी मा. सोनिला राव आणि नाशिक शहर कार्यवाहिका सुहासिनी रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपारिक पद्धतीने शस्त्र पूजनाने झाला. याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या ९० वर्षांच्या दैदिप्यमान प्रवासाचा आढावा घेण्यात आला, तसेच उपस्थितांचे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी आपल्या भाषणात, “काळ बदलला तरी व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण करण्याचा राष्ट्र सेविका समितीचा मूलभूत विचार आजसुद्धा तितकाच कालसुसंगत आहे,” असे उद्गार काढले. सुदृढ मन, सुबुद्धी आणि उत्तम शरीर हीच खरी लक्ष्मीची रूपे असल्याचे सांगत त्यांनी स्त्रीशक्तीला राष्ट्र उभारणीत योगदान दिल्याबद्दल कौतुक केले.
यानंतर प्रांत अधिकारी सोनिला राव यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून सेविकांना राष्ट्रकार्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
शुभेच्छा संदेशानंतर उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर सौ. आशा गोलिया, मा. अनघा चिपळूणकर, सौ. राजेश्वरी कुलकर्णी आणि मा. अनघा जोशी या मान्यवरांच्या हस्ते भक्तिभावाने ध्वजपूजन संपन्न झाले. ध्वजपूजनानंतर सेविकांचे शिस्तबद्ध संचलन पार पडले.
एकाच मैदानातुन निघालेले संचलनाच्या दोन वाहिनी विरुद्ध दिशेने गेल्या.
BYK सिग्नलजवळ एकाच वेळी दोन्हीही वाहिनी एकत्रित आल्या. *पथदर्शिका, फलकधारी सेविका, दंडधारी सेविकांचे गण, दोन्हीही वाहिनीचे ध्वज, दोन्हीही घोषगण तसेच सर्व सेविकांचे गण हे दुभाजकाच्या दोन्हीही बाजुने घोषाच्या तालावर पावलं टाकीत अगदी एकसारखे चालत होते . हे अतिशय कौतुकास्पद दृश्य होते. दोन्हीही वाहिनी एकसाथ मार्गक्रमण करतसंचलन स्थानावर परतल्या.
संचलन मार्ग:


  • नागरिकांकडून जोरदार स्वागत:
    दोन्हीही भागातील मार्गावर संचालनाचे स्वागत करणारे आकर्षक फलक लावण्यात आले होते. मार्गावर अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून संचलनाचे जोरदार स्वागत केले. तसेच, काही ठिकाणी देशभक्तीपर गाणी लावून या संचलनाबद्दलचा उत्साह द्विगुणीत करण्यात आला.
    सहाही भागांतील सहभाग:
    या संचलनात शहरातील समिती रचनेनुसार सहाही भागांतील सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये नाशिक रोड, इंदिरानगर, सिडको, म्हसरूळ, भोसला आणि पंचवटी या भागांचा समावेश होता.
    संचलन प्रमुख सौ. नीरजा देशमुख, शहर शारीरिक प्रमुख हर्षदा कुलकर्णी आणि सौ. सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण संचलन अतिशय यशस्वी आणि दिमाखात संपन्न झाले.
    कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आदरपूर्वक वातावरणात ध्वजावतरण करण्यात आले. त्या नंतर सेविकांनी एका सुरात स्फूर्तीदायक सांघिक गीत सादर केले.
    राष्ट्र सेविका समिती च्या विभाग कार्यवाहिका मा. डॉ. शुभांगी ताई कुलकर्णी तसेच विभाग सेवा प्रमुख मा. सौ. रेखाताई दाणी या संचालनाला उपस्थित होत्या.
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, आमदार, नगरसेविका, नाशिक शहरातील नागरिक, भगिनी व समितीच्या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अतिशय देशभक्तीपूर्ण वातावरणात या सोहळ्याची सांगता झाली.

शिस्तबद्ध संचलन व शस्त्र पूजन आणि ध्वज पूजनाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!