चांदवडला “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” कार्यशाळा
कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती



चांदवड (शहर प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय माझे गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष अक्षय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमंत आहेरराव, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक-सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच मोठ्या संख्येने हजर होते.


या वेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदवड मच्छिंद्र साबळे यांनी प्रस्तावना करून मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी मातेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात केली. या कार्यशाळांमध्ये माझे गाव आरोग्य संपन्न गावाचे 59 इंडिकेटरवर चर्चा करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी व राज्यस्तरीय टीमचे अध्यक्ष अक्षय राऊत यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनेचे पूर्ण सविस्तर माहिती दिली.





